Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी भव्य आक्रोश मोर्चा; आरोपीला फाशी देण्याची मागणी

    चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी भव्य आक्रोश मोर्चा; आरोपीला फाशी देण्याची मागणी

    Palam VruttBy Palam VruttOctober 15, 2024

    पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – सोनपेठ येथील चार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी कहार भोई समाजाच्या (Bhoi Samaj) वतीने तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोनपेठ येथील एल आर के इंग्लिश स्कूल शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी दि.७ रोजी सोनपेठ पोलीसात दिली होती . या तक्रारीची दखल घेऊन सोनपेठ पोलीसांनी एका संशयित आरोपींवर बालकांचा लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

    सदरील तपासात पोलीस दिरंगाई करत असल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली तसेच पोलीस संशयित आरोपीला अटक करत नसल्याने समाजात मोठा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे कहार भोई समाजाच्या वतीने दि.१५ रोजी सोनपेठ तहसील कार्यालयावर भव्य अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण राज्यभरातुन मोठ्या संख्येने कहार भोई समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सोनपेठ येथे हजर झाले होते.

    यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ,सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी,शाळा प्रशासनावर कारवाई करावी,या प्रकरणात टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पिडीतेला न्याय मिळवुन द्यावा या मागण्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

    या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवला.मोर्चेकऱ्यांनी दिलेले निवेदन प्रशासनाच्या वतीने देवेंद्रसिंह चंदेल यांनी स्विकारले.
    या मोर्चाला सोनपेठ तालुक्यातील माजी सैनिकांनी पाठींबा देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता करण्यात आली.- सोनपेठ तहसील कार्यालयावर चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी कहार भोई समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

    • प्रमुख मागण्या –
    1. लैंगिक आत्याचार प्रकरणातील पुरावे नष्ट करणाऱ्या पि.आय.बोलमवार व त्याचे सहकारी पि.एस.आय. यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कार्यवाही करावी.
    2. एल.आर. के इंग्लिश स्कूल शाळेतील मुख्याध्यापक सह सर्व शिक्षकांना सह आरोपी शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी.
    3. मोकाट असलेला मुख्या आरोपी तात्काळ अटक करुन पोस्को अंतर्गत कार्यवाही करुन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवुन आरोपिस फाशिची शिक्षा द्यावी.
    Post Views: 44
    bhoi samaj morcha sonpeth news
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (109)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (72)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (68)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (62)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (57)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (57)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.