पाथरी / प्रतिनिधी – पाथरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवार (दि.20) रोजी पार पडली यात पाथरी विधानसभा मतदारसंघात पुरुष 2 लाख 3 हजार 45 स्त्री 1 लाख 90 हजार 197 तृतीयपंथी दोन एकूण 3 लाख 93 हजार 244 मतदारांपैकी पुरुष 1 लाख 47 हजार 146 स्त्री 1 लाख 31 हजार 958 एकूण 2 लाख 79 हजार 104 ( 70.97 ) टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 23 नोव्हेंबर शनिवार रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार असून निवडणूक विभागा ने मतमोजणीसाठी तयारी सुरू केली आहे. मतमोजणी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था विटा रोड पाथरी…
Author: Palam Vrutt
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे (सरकारी नोकरी 2024) बँक ऑफ इंडियाने व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक, डेटा अभियंता यासह विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू असून शेवटची तारीख २९ नोव्हेंबर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट, bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पूर्वीची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर होती. निवडलेल्या उमेदवारांना भारतातील कोणत्याही कार्यालयात/शाखेत नियुक्त केले जाईल. उमेदवाराची 03 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा 62 वर्षे वयाची होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते कराराच्या आधारावर नियुक्त केले जाईल. आणि त्यानंतर बँकेच्या विवेकबुद्धीनुसार समाधानकारक कामगिरीच्या अधीन राहून, ०१…
अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत केले मतदानाचे आवाहन पाथरी – 98 पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा यासाठी निवडणूक विभागामार्फत स्वीप टीम च्या माध्यमातून गावोगावी जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. निवडणूक दोन दिवसावर आले म्हणून निवडणूक विभागातील सर्व अधिकारी, तालुक्यातील अधिकारी, पोलीस, कर्मचारी यांनी दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ( सोमवार ) रोजी दुपारी१२:०० वा. पंचायत समिती पाथरी येथून सेलू कॉर्नर मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते, 98 पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची जनजागृती करून मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा या उद्देशाने या…
डॉ पवन चांडक व राजेंद्र खापरे यांचा रोज 150 किमी सायकल प्रवास परभणी / प्रतिनिधी – होमिओपॅथिक अकॅ डमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे आयोजित 1000 किमी जगन्नाथ धाम सायकल संवाद यात्रा परभणी येथील रहिवासी डॉ.पवन चांडक व राजेंद्र खापरे यांनी 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान नागपूर – भंडारा – देवरी – राजनांदगाव – दुर्ग – रायपूर – सरायपल्ली – सोनपूर – बौध – दासपल्ली – नयागढ मार्गे जगन्नाथ पुरी येथे पोहोचून 6 दिवसांत पूर्ण केली. या दोघांनी 10 नोव्हेंबर रोजी नागपूर हुन सायकल प्रवास सुरवात करून वाटेत श्री मेंटल्स फॅक्टरी भंडारा, सोंदड येथे रामदेव बाबा मंदिर, देवरी…
मानवत / प्रतिनिधी – स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती काढून मानवत तालुक्यातील केकर जवळा येथे पेट्रोलींग करीत असताना एक पांढर्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन पकडले. त्यामध्ये दारूचे बॉक्स टाकून वाहन पोखर्णी-पाथरी रोडने मंगरूळच्या दिशेने रामेटाकळीकडे येत होते. मिळालेल्या माहितीवरून रामेटाकळी फाटा येथे जाऊन पथकाने चालकास गाडीस थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबता भरधाव वेगाने सुसाटपणे चालवत निघून गेला. पथकाने त्याचा लागलीच पाठलाग करायला सुरूवात केली. त्यास शेवटी रामपुरी शिवारात सुनील त्र्यंबकराव यादव यांच्या शेताजवळ सार्वजनिक रोडवर रामपुरी बु. येथे थांबवून आरोपी शुभम जयराम लहाणे (वय 22 वर्षे, रा. साखला प्लाट, परभणी), गणपत माधवराव काळे (वय 37 वर्षे,रा. टाकळी कुभकर्ण,…
रविवारी जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. आपण माघार का घेत आहोत हे सुद्धा जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीतील आताच्या घडीची मोठी बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. 288 जागांवर निवडूक लढण्याची तयारी जरांगेंनी केली होती. कालपासून ते 13- 14 जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता त्यांनी निवडणूक…
पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – पाथरी विधानसभा निवडणूक (pathari assembly election) साठी एकूण 47 उमेदवारांचे 65 उमेदवारी अर्ज शिल्लक असून अर्ज मागे घेण्यासाठी आज दिनांक 4 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ची अंतिम वेळ आहे.यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फक्त पाचच तास वेळ शिल्लक असल्याने अर्ज दाखल केलेल्या उमेदवार यांना धावपळ करावी लागणार आहे. दुपारी 3 वाजता 98 पाथरी विधानसभा निवडणूक अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर आजच नोंदणीकृत मान्यता प्राप्त राजकीय पक्ष यांना त्यांचे निवडणूक आयोगाने निश्चित केलेले चिन्ह मिळेल व राजकीय पक्षांचे उमेदवार व्यतिरिक्त इतर…
मनोज जरांगे यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. तसंच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आपण लढणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आष्टी, गेवराई मतदारसंघातून लढायचं की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मंठा परतूर मतदारसंघातून उमेदवार देत तेथूनही लढणार आहेत. आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत. आपल्याला आधार पाहिजे. राजकारणाचं वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. एखाद्या जिल्ह्याला जागा दिली तर पूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच…
पाथरी/प्रतीनिधी – पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राजकीय पक्ष/अपक्ष अशा ५३ ऊमेदवारांनी ७७ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. दि. ३० आॅक्टोबर बुधवार रोजी तहसील कार्यालय पाथरी येथे सकाळी ११ वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी समोर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली यात अकरा उमेदवारांचे बारा नामनिर्देशन पत्रे बाद झाले यामध्ये १)दीपक सिंग उत्तमराव सिसोदिया अपक्ष, २) तुकाराम धोंडीबा रुमाले वंचित बहुजन आघाडी, ३) शेख निसार शेख अमीन अपक्ष, ४) विठ्ठल सोपान उजगरे अपक्ष, ५) अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणी एनसीपीएस, ६) शेख कदीर शेख खाजा अपक्ष, ७) सईद खान शेरगुल खान शिवसेना, ८)सुरेश किशनराव फड वंचित बहुजन आघाडी, ९) निर्मला उत्तमराव गवळी (२)…
अभिनेत्री भाग्यश्री हिने सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. मैंने प्यार किया सिनेमातील सलमान आणि भाग्यश्रीची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस तरुणींना लाजवेल असा आहे. विशेष म्हणजे मैंने प्यार कियाच्या माध्यमातून भाग्यश्री रातोरात सुपरस्टार झाली. भाग्यश्रीची क्रेझ आजही कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. तिने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.

