Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा

    ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा

    Palam VruttBy Palam VruttOctober 24, 2024

    दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने २ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (२४ ऑक्टोबर) फेटाळली आहे. न्यायमूर्ती म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू शकते. मात्र त्यांना या निवडणूक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागेल.

    सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाकडे देताना काही अटी घातलेल्या आहेत. या अटी पाळल्या जात नाहीत, असे सांगत शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार गटाकडून अटी पाळल्या जात नाही आणि त्यामुळे घड्याळ चिन्ह गोठवून त्यांना आमच्याप्रमाणेच (तुतारी) नवीन चिन्ह या विधानसभा निवडणुकीसाठी द्या, अशी मागणी शरद पवार गटाने केलेली आहे.

    दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला यासंदर्भात नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १९ मार्च रोजीच्या आदेशानुसार सूचनेसह (Disclaimer – हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना) आम्ही निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू, असं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत या आदेशाचं पालन झालंच पाहिजे,असंही न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला बजावलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्या चिन्हाजवळ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना नमूद करण्यास सांगितलं आहे.

    सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा
    सुप्रीम कोर्टाने यावेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांना इशारा दिला. दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करायचे आहे. नाहीतर आम्ही अवमानाचा ठपका ठेवू. तुम्ही दोघांनीही तुम्हाला दिलेले निर्देश पाळले पाहिजेत. जर मुद्दाम निर्देशांचे उल्लंघन कोणी केलं तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू. आम्ही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू, असं आश्वासन अजित पवारांनी कोर्टात दिलं.

    Post Views: 62
    emove term: Supreme Court on Clock Symbol for Ajit Pawar NCP Supreme Court on Clock Symbol for Ajit Pawar NCP NCP Sharad Pawar vs Ajit Pawar in Supreme Court Remove term: NCP Hearing NCP Hearing Supreme Court Clock symbol Hearing Update Whose 'clock' symbol?
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (108)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (71)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (67)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (62)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (57)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (55)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.