Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया अचूकपणे पार पाडावे – शैलेश लाहोटी

    मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया अचूकपणे पार पाडावे – शैलेश लाहोटी

    Palam VruttBy Palam VruttOctober 27, 2024

    पाथरी / प्रतिनिधी – पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करिता मतदान केंद्रावर मतदानाचे काम करण्यासाठी नियुक्त केलेले मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे निवडणूक कामाविषयीचे पहिले प्रशिक्षण दिनांक 27 ऑक्टोबर ( रविवार )रोजी नवीन शासकीय गोदाम (औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयटीआय ) जवळ विटा रोड पाथरी येथे पार पडले यावेळी निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले कर्तव्य अचूक पार पाडावे असे आवाहन श्री. शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना केले. तसेच प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश श्री शैलेश लाहोटी यांनी दिले.

     

    या प्रशिक्षण निमित्ताने सकाळपासून विटा रोड परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रेल चेल होती रविवार रोजी प्रशिक्षण पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली तर दुपारच्या प्रशिक्षणाची सुरुवात दोन वाजता झाली यावेळी प्रशिक्षण ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांचे उपस्थिती नोंदविण्यासाठी 21 दालन तयार करण्यात आले होते त्याच ठिकाणी ईव्हीएम हाताळणी ईव्हीएम सेलिंग करण्यासाठी स्वतंत्र मास्टर ट्रेनर्स यांच्या द्वारे प्रात्यक्षिका करून दाखविण्यात आली.
    मतदान जनजागृती अभियान तर्फे या ठिकाणी मी मतदान करणारच या स्टिकर्सचे मतदान कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले .

     

    प्रशिक्षण दरम्यान LCD वर PPT दाखवून त्याचे मार्गदर्शन करण्यातआले. त्यात मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्रावर करावयाचे कामे पहिला मतदान अधिकारी, दुसरा मतदान अधिकारी, व तिसरा मतदान अधिकारी यांनी कोणती कामे करावी याची संपूर्ण माहिती व निवडणूक आयोगाने निवडणूक विषयी केलेल्या सर्व सूचनांचे मार्गदर्शन श्री. पांडुरंग माचेवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व शंकर हांदेश्वार सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी केले प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी श्री. वसंत महाजन नायब तहसीलदार, श्री. धारासूरकर नायब तहसीलदार, श्री. गजानन अन्नपुरे अवल कारकून, वसीम अक्रम अवल कारकून, गजानन गायकवाड, मनेरे आर एस केसकर इत्यादी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायक गट विकास अधिकारी श्री. सूर्यकांत किट्टे यांनी केले.

     

    प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणार कडक कार्यवाही
    पाथरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सकाळ सत्रातील 1 हजार 50 पैकी 75 कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते तर दुपार सत्रातील 1 हजार 38 पैकी 83 निवडणूक कर्मचारी प्रशिक्षणासाठी अनुपस्थित होते एकूण 158 अनुपस्थित होते अनुपस्थित कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटिसा देऊन कडक कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केल्या.

    Post Views: 46
    pathari election pathari news pathari vidhansabha election vidhansabha election 2024
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (108)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (71)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (67)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (61)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (56)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (55)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.