डॉ पवन चांडक व राजेंद्र खापरे यांचा रोज 150 किमी सायकल प्रवास
परभणी / प्रतिनिधी – होमिओपॅथिक अकॅ डमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे आयोजित 1000 किमी जगन्नाथ धाम सायकल संवाद यात्रा परभणी येथील रहिवासी डॉ.पवन चांडक व राजेंद्र खापरे यांनी 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान नागपूर – भंडारा – देवरी – राजनांदगाव – दुर्ग – रायपूर – सरायपल्ली – सोनपूर – बौध – दासपल्ली – नयागढ मार्गे जगन्नाथ पुरी येथे पोहोचून 6 दिवसांत पूर्ण केली.
या दोघांनी 10 नोव्हेंबर रोजी नागपूर हुन सायकल प्रवास सुरवात करून वाटेत श्री मेंटल्स फॅक्टरी भंडारा, सोंदड येथे रामदेव बाबा मंदिर, देवरी जि गोंदिया इत्यादी ठिकाणी स्थानिक सामाजिक संस्था व सायकलिंग ग्रुप, क्रीडाप्रेमी, उद्योगपती व पत्रकारांच्या ग्रुप शी संवाद साधला. 11 तारखेला देवरी हुन सायकलिंग करत राजनांदगाव येथील शासकीय डिजिटल लायब्ररी येथे भेट देऊन उपस्थित वाचकांशी संवाद साधला. पुढे दुर्ग येथे रामदेव मंदिर भवन येथे माहेश्वरी पंचायत समिती येथे दुर्ग येथील माहेश्वरी समाजातील नागरिकांशी तर भिलाई ते रायपूर मार्गावर ठिक ठिकाणी कंपनीत काम करणार्या स्थानिक कामगारांमध्ये कौटूंबिक वाचन चा संदेश दिला. 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान सरायपल्ली, सोहेला, बारपल्ली, बिनका, महादेवपल्ली, सोनपूर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या स्वयंसेवकांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. पुढे सोनपूर – दसपल्ली – नायागढ – रणपूर – रामेश्वर – चंदनपूर मार्गे दि 15 नोव्हेंबर रोजी जगन्नाथ पुरी पोहोचून सायकल संवाद यात्रेचा समारोप केला.
या मोहिमेच्या यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ रामेश्वर नाईक व सचिन कोंडेकर, नागपूर येथील डॉ महेश अवचट, राम शेळके, भंडारा येथील पंकज सारडा, मनीष लोहिया (सोंदड), पत्रकार विलास शिंदे व देवेंद्र गणवीर (देवरी), दिलीपजी राठी (दुर्ग,) नकुलसिंग, संतोष बहेरा, प्रणब नायक, सोमेन्द्र पंडा आदींचे सहकार्य लाभले.


