निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांची माहिती
पाथरी/प्रतीनिधी – पाथरी विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असून मतदारांना मतदान केंद्रावर आपले मतदान करण्यासाठी ओळखपत्र चा पुरावा सादर करावा लागतो त्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयाने दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी परिपत्रकाद्वारे कोण कोणते ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करता येईल याची यादी प्रसिद्ध केली आहे.
त्यामध्ये आधार कार्ड,मनरेगा जॉब,कार्ड बँक,पोस्ट ऑफिस ने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहनचालक परवाना,पॅन कार्ड,रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचे द्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गम स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्ट फोटो पेन्शन दस्तावेज केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र,खासदारांनी आमदारांनी जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र,भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाचे जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र आदी ओळखपत्र हे मतदारांना मतदान केंद्रावर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे.


