पाथरी / प्रतिनिधी – पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करिता मतदान केंद्रावर मतदानाचे काम करण्यासाठी नियुक्त केलेले मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे निवडणूक कामाविषयीचे पहिले प्रशिक्षण दिनांक 27 ऑक्टोबर ( रविवार )रोजी नवीन शासकीय गोदाम (औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयटीआय ) जवळ विटा रोड पाथरी येथे पार पडले यावेळी निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले कर्तव्य अचूक पार पाडावे असे आवाहन श्री. शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना केले. तसेच प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश श्री शैलेश लाहोटी यांनी दिले.
या प्रशिक्षण निमित्ताने सकाळपासून विटा रोड परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रेल चेल होती रविवार रोजी प्रशिक्षण पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली तर दुपारच्या प्रशिक्षणाची सुरुवात दोन वाजता झाली यावेळी प्रशिक्षण ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांचे उपस्थिती नोंदविण्यासाठी 21 दालन तयार करण्यात आले होते त्याच ठिकाणी ईव्हीएम हाताळणी ईव्हीएम सेलिंग करण्यासाठी स्वतंत्र मास्टर ट्रेनर्स यांच्या द्वारे प्रात्यक्षिका करून दाखविण्यात आली.
मतदान जनजागृती अभियान तर्फे या ठिकाणी मी मतदान करणारच या स्टिकर्सचे मतदान कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले .
प्रशिक्षण दरम्यान LCD वर PPT दाखवून त्याचे मार्गदर्शन करण्यातआले. त्यात मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्रावर करावयाचे कामे पहिला मतदान अधिकारी, दुसरा मतदान अधिकारी, व तिसरा मतदान अधिकारी यांनी कोणती कामे करावी याची संपूर्ण माहिती व निवडणूक आयोगाने निवडणूक विषयी केलेल्या सर्व सूचनांचे मार्गदर्शन श्री. पांडुरंग माचेवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व शंकर हांदेश्वार सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी केले प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी श्री. वसंत महाजन नायब तहसीलदार, श्री. धारासूरकर नायब तहसीलदार, श्री. गजानन अन्नपुरे अवल कारकून, वसीम अक्रम अवल कारकून, गजानन गायकवाड, मनेरे आर एस केसकर इत्यादी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायक गट विकास अधिकारी श्री. सूर्यकांत किट्टे यांनी केले.
प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर होणार कडक कार्यवाही
पाथरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सकाळ सत्रातील 1 हजार 50 पैकी 75 कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते तर दुपार सत्रातील 1 हजार 38 पैकी 83 निवडणूक कर्मचारी प्रशिक्षणासाठी अनुपस्थित होते एकूण 158 अनुपस्थित होते अनुपस्थित कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटिसा देऊन कडक कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केल्या.


