मनोज जरांगे यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. तसंच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आपण लढणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आष्टी, गेवराई मतदारसंघातून लढायचं की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मंठा परतूर मतदारसंघातून उमेदवार देत तेथूनही लढणार आहेत.
आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत. आपल्याला आधार पाहिजे. राजकारणाचं वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. एखाद्या जिल्ह्याला जागा दिली तर पूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच यायचं. एक एक का होईना पण तो आधार होईल. तो विधानसभेत भांडेल. आपले मुद्दे मांडेल. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही. निवडून येणार्या जागांवर चर्चा करू. मुस्लिम आणि आंबेडकरी नेते येतील त्यांच्या जागा सांगतील. त्यावर चर्चा करू. कमीत कमी १० ते १५ आपल्या हक्काचे आहेत, हे म्हणायला होईल. २०० लडून पडण्यात अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत, असे ते म्हणाले.
काय निर्णय घेतला आहे?
संभाजीनगर-फुलंब्री मतदार संघातून लढणार
संभाजीनगर: कन्नड मतदार संघातून लढायचं की नाही यावर विचार करून निर्णय घेणार
संभाजीनगर:गंगापूर मतदार संघात उमेदवार पाडणार
संभाजीनगर: संभाजीनगर पश्चिम मतदार संघात पाठिंबा देणार
हिंगोली :कळमनुरी मतदार संघात उमेदवार पाडणार
हिंगोली:वसमत मतदार संघातून उमेदवार द्यायचा की नाही यावर विचार करणार
जालना: भोकरदन मतदार संघात उमेदवार पाडणार
आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे. त्यांना चार उंबरे घर हक्काचं करायचं आहे. मराठ्यांचे १५० ते २०० आमदार आहेत. पण आम्हाला आधार नाही. आम्हाला दार उघडं नाही. आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे. आमचा म्हणून काम सांगायचं आहे. माझी काही इच्छा नाही. मला यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी एक तरी माणूस द्यायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका. जात बघा. खूप जण आले. वगैरे वगैरे भरपूर नेते भेटायला आले. सर्वच पक्षाचे लोक आले होते, असे त्यांनी सांगितले.


