Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी

    लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी

    Palam VruttBy Palam VruttNovember 16, 2024

    मानवत / प्रतिनिधी – स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती काढून मानवत तालुक्यातील केकर जवळा येथे पेट्रोलींग करीत असताना एक पांढर्‍या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन पकडले. त्यामध्ये दारूचे बॉक्स टाकून वाहन पोखर्णी-पाथरी रोडने मंगरूळच्या दिशेने रामेटाकळीकडे येत होते. मिळालेल्या माहितीवरून रामेटाकळी फाटा येथे जाऊन पथकाने चालकास गाडीस थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबता भरधाव वेगाने सुसाटपणे चालवत निघून गेला. पथकाने त्याचा लागलीच पाठलाग करायला सुरूवात केली. त्यास शेवटी रामपुरी शिवारात सुनील त्र्यंबकराव यादव यांच्या शेताजवळ सार्वजनिक रोडवर रामपुरी बु. येथे थांबवून आरोपी शुभम जयराम लहाणे (वय 22 वर्षे, रा. साखला प्लाट, परभणी), गणपत माधवराव काळे (वय 37 वर्षे,रा. टाकळी कुभकर्ण, ता. जि. परभणी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 88 हजार 65 रुपयांची देशी व विदेशी दारू, 2 मोबाईल व वाहन असा एकूण 7 लाख 1 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन मानवत पोलीस ठाणे येथे हजर केले. आरोपींनी हा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याकरिता ताब्यात बाळगून वाहतूक करताना वाहन क्रमांक एमएच22A एएन 4265 मध्ये वाहतूक करीत असताना मिळून आले. तसेच वाहनाचा चालक शुभम लहाने याने त्याच्या ताब्यातील पिकअप वाहन हे इतर आरोपींच्या सांगण्यावरून भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून इतरांच्या जीवितास धोका होईल असे चालवले म्हणून मानवत पोलीस ठाण्यात कलम 281 बी.एन.एस. 2023,65 (A), (श) म. दा. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्था.गु.शा.चे पो.नि. विवेकानंद पाटील, स.पो.नि.संदीप बोरकर,पोउपनि गोपीनाथ वाघमारे व पोलीस अंमलदार विलास सातपुते, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, संजय घुगेने.स्था.गु.शा. व गणेश कौटकरे (सायबर सेल) यांनी मिळून ही कारवाई केली. यातील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून निशांत भैय्यालाल जयस्वाल हा आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला.

    Post Views: 58
    crime news illegal liquor manwat news parbhani news police news
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (108)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (71)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (67)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (65)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (61)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (56)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (55)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.