Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    Palam VruttBy Palam VruttNovember 18, 2024

    अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत केले मतदानाचे आवाहन

    पाथरी – 98 पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा यासाठी निवडणूक विभागामार्फत स्वीप टीम च्या माध्यमातून गावोगावी जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे.

     

    निवडणूक दोन दिवसावर आले म्हणून निवडणूक विभागातील सर्व अधिकारी, तालुक्यातील अधिकारी, पोलीस, कर्मचारी यांनी दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ( सोमवार ) रोजी दुपारी१२:०० वा. पंचायत समिती पाथरी येथून सेलू कॉर्नर मार्गे पोलीस स्टेशन पर्यंत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते, 98 पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची जनजागृती करून मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, पाथरी सोनपेठ व मानवत तालुक्यातील विविध कार्यालयाच्या प्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी या मानवी साखळीमध्ये सहभाग घेतला होता, तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी ताई, नगरपालिकेतील कर्मचारी, विविध शाळेतील शिक्षक , सर्व कार्यालयातील कर्मचारी यांनीही सहभाग नोंदवला, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे या आशयाच्या घोषणा अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी दिल्या.

     

    याप्रसंगी श्री. शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समाधान पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री शंकर हांदेशवार तहसीलदार पाथरी, श्री पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत, श्री सुनील कावरखे तहसीलदार सोनपेठ, श्री ईश्वर पवार गटविकासअधिकारी पाथरी , श्री मधुकर कदम गट विकासअधिकारी मानवत, श्री तुकाराम कदम मुख्याधिकारी पाथरी, श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी मानवत, श्री मंडलवार पोलीस निरीक्षक पाथरी, श्री वसंत महाजन नायब तहसीलदार निवडणूक, श्री गंगाधर येल्हारे नायब तहसीलदार, श्री जीवन धारासुरकर नायब तहसीलदार, मीडिया कक्ष प्रमुख श्री संदीपान घुंबरे,जमील सिद्दीकी , श्रीमती लोंढे, श्री पुजारी तालुकाआरोग्य अधिकारी पाथरी, श्रीमती मंगल गायकवाड बालविकास अधिकारी पाथरी, यांची प्रमुख उपस्थिती होती.स्विप टीमचे मुकेश राठोड गटशिक्षणाधिकारी, शंकर धावारे, धम्मपाल उघडे, किशन डहाळे, सचिन चव्हाण यांनी या मानवी साखळी रॅलीचे संचालन केले.

    लोकशाही अधिक मजबूत आणि बळकट करण्यासाठी पाथरी मतदारसंघातील मतदारांनी ” एक दिवस लोकशाहीसाठी ” म्हणून 20 नोव्हेंबर 24 ( बुधवार) रोजी 100 टक्के मतदारांनी निवडणुकीचे हक्क बजावण्याचे संकल्प करावे आपण स्वतःही मतदान करून इतरांनाही मतदानास प्रवृत्त करण्याचे संदेश मानवी साखळी तयार करून दिला आहे .मला विश्वास आहे लोकसभे पेक्षाही विधानसभेत पाथरी मतदारसंघात जास्त मतदान होईल.
    श्री शैलेश लाहोटी
    निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी

    Post Views: 59
    pathri news pathri vidhansabha election 2024 vidhansabha election 2024
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (108)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (71)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (67)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (65)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (61)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (56)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (55)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.