Author: Palam Vrutt

पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – सोनपेठ येथील चार वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी कहार भोई समाजाच्या (Bhoi Samaj) वतीने तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोनपेठ येथील एल आर के इंग्लिश स्कूल शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी दि.७ रोजी सोनपेठ पोलीसात दिली होती . या तक्रारीची दखल घेऊन सोनपेठ पोलीसांनी एका संशयित आरोपींवर बालकांचा लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सदरील तपासात पोलीस दिरंगाई करत असल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली तसेच पोलीस संशयित आरोपीला अटक करत नसल्याने समाजात मोठा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे कहार भोई समाजाच्या वतीने दि.१५…

Read More

सेलू / प्रतिनिधी – नाशिक येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मराठवाडा भूषण पुरस्कार (Marathwada Bhushan Purskar) यावर्षीचे मानकरी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे (Shriram Pratishthan Founder President Shikshan Maharishi Dr. Sanjay Rodge) हे ठरले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो असे आयोजकांनी सांगितले. शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल जसे की, मराठवाड्यातील पहिली ज्ञानतीर्थ विद्यालय मराठी माध्यमाची डिजिटल शाळा सुरू करणे,…

Read More

परभणी : येथील शारदा महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन (APJ Abdul Kalam’s birth anniversary reading inspiration day) म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार उपस्थित होते. तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. बबन पवार म्हणाले की ए पी जे अब्दुल कलाम हे अत्यंत सामान्य परिस्थितीतून घडलेले व्यक्तिमत्व असून मच्छीमाराच्या पोटी जन्म घेऊन देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही केवळ वाचन व कलम…

Read More

सेलू / प्रतिनिधी – येथील बाजार समितीकडे असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी नगर परिषदेने सचिव व अकाऊंटंट यांच्या दालनाला नगर परिषदेच्या वतीने आज सील लावण्यात आले आहे .यावेळी उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण ,कर प्रशासक मुस्तजाब खान,उमाकांत बेंदरे, सोमेश्वर भुलंगे,चोबी आदींची उपस्थिती होती . सेलू नगर परिषदेची येथील बाजार समिती कडे १९९८/९९ पासूनची मालमत्ता कराची थकबाकी ७६,०१ ,६३८ रुपये आहे .याबाबत वारंवार मागणी करून देखील बाजार समितीने या थकबाकीची रक्कम जमा न केल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे .याबाबत काल संबंधित अधिकाऱ्याची बैठक झाली व त्यामध्ये दि १५/१०/२४ रोजी थकबाकीचा चेक देण्याचे ठरले होते .परंतु याबाबत कसलीही कार्यवाही झाली नाही व…

Read More

सेलू / प्रतिनिधी – अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत प.पू.स्वामी गोविंददेवगिरी महाराजांच्या अमृततुल्य व रसाळ वाणी मधून मराठी मधून श्रीराम कथेचा लाभ भाविकांना होणार आहे. येथील नूतन विद्यालयामागील क्रीडांगणावर” हनुमानगढ” या ठिकाणी ही कथा संपन्न होणार आहे. दरम्यान दि 15 रोजी सकाळी आठ वाजता शिर्डीचे संत व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब मंदिर पासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. तर बालाजी मंदिर येथे शोभयात्रेचा समारोप होणार आहे.शोभायात्रेत बँड पथक ,धर्म ध्वज व अश्व, मारोती ध्वजधारी युवक ,श्री राम उत्सव मूर्ती ,श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे लेझीम पथक, कलशधारी माता भगिनी ,तुळस धारी माता भगिनी, सेलूतील सर्व महिला भजनी मंडळ…

Read More

पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – सोनपेठ येथे इंग्लिश स्कूल मध्ये शिकणाऱ्या कहार समाजाच्या चार वर्षीय बालिकेवर शाळेतील शिक्षकांने अत्याचार केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली आहे. वरील घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी ११:३० वाजता पैठण येथे कहार समाजाच्या वतीने प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास कहार गल्ली येथील दक्षिण मुखी मारुती मंदिर येथून सुरुवात झाली. हा मोर्चा गागाभट्ट चौक, शिवाजी चौक, बस स्थानक चौक मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. अशा घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता . मोर्चात संभाजीनगर, अहमदनगर बीड, जालना…

Read More

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc exams) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट ‘ब’ (अराजपत्रित) (ungazetted) व गट ‘क’ या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार असल्याचे आयोगाने कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमावर वाढ होत आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ, परीक्षा २०२३ च्या निकाल प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, न्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब या सर्व बाबीचां विचार करून गट-‘ब’ (अराजपत्रित) सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा व गट ‘क’ सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने…

Read More

पाथरी प्रतिनिधी /  रमेश बिजुले  – सोनपेठ येथील भोईसमाजाच्या साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करून जलद न्यायालयात प्रकरण चालवून फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी ग्लोबल कहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तहसिलदार यांच्या वतीने मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात बदलापुरला लाजवेल अशी घटना सोनपेठ येथे घडली आसून कष्टकरी, गरीब मच्छीमार भोई समाजातील एल आर के इंग्लिश स्कूल विद्यालय सोनपेठ बालवाडीत शिकणा-या साडेचार वर्षीय मुलीवर शाळेतील स्वच्छता गृहात शाळेतीलच शिक्षक आरोपीने अत्याचार केल्याचे या पिडीत मुलीने सांगुन सुध्दा आरोपी मोकाटच आहे यामुळे पोलीसांची भुमिका संशयास्पद दिसुन येत आहे या आरोपीस राजकीय पाठबळ मिळत आहे केवळ माजी आमदार पुतण्याचा…

Read More