Author: Palam Vrutt

परभणी / प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. या छानणीत परभणी मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद समी उर्फ माजू लाला यांचा अर्ज अवैध ठरला आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 46 उमेदवारांंनी 59 अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे विद्यमान आ. डॉ. राहूल पाटील, शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे आणि वंचित बहुजन आघाडीचे सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता होती. मात्र छाननीमध्ये माजू लाला यांच्या नामनिर्देशन अर्जातील तांत्रिक चुकीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे निवडणूक अधिकार्यांनी…

Read More

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा केवळ पुण्यातच नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ह्याच लाडक्या गणपती बाप्पांची केवळ मूर्तीच नाही तर हुबेहूब मंदिरच आता थायलंड मधील फुकेत येथे उभारण्यात आले आहे आणि या मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पांची विधिवत स्थापना व पूजन देखील करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने फुकेत मध्ये स्थापन होत असलेल्या दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक नुकतीच लाल महाल ते दगडूशेठ गणपती मंदीर अशी काढण्यात आली. पुण्यात झालेल्या विधिवत पूजन कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण राजूशेठ सांकला, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित…

Read More

पाथरी / प्रतिनिधी – पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक करिता मतदान केंद्रावर मतदानाचे काम करण्यासाठी नियुक्त केलेले मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे निवडणूक कामाविषयीचे पहिले प्रशिक्षण दिनांक 27 ऑक्टोबर ( रविवार )रोजी नवीन शासकीय गोदाम (औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयटीआय ) जवळ विटा रोड पाथरी येथे पार पडले यावेळी निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले कर्तव्य अचूक पार पाडावे असे आवाहन श्री. शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना केले. तसेच प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश श्री शैलेश लाहोटी यांनी दिले. या प्रशिक्षण निमित्ताने सकाळपासून विटा रोड परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांची…

Read More

निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांची माहिती पाथरी/प्रतीनिधी – पाथरी विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असून मतदारांना मतदान केंद्रावर आपले मतदान करण्यासाठी ओळखपत्र चा पुरावा सादर करावा लागतो त्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयाने दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी परिपत्रकाद्वारे कोण कोणते ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करता येईल याची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये आधार कार्ड,मनरेगा जॉब,कार्ड बँक,पोस्ट ऑफिस ने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहनचालक परवाना,पॅन कार्ड,रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचे द्वारे नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गम स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्ट फोटो पेन्शन दस्तावेज केंद्र राज्य सरकार…

Read More

परभणी / प्रतिनिधी – जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झालेली आहे. तसेच वंचितनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून यावेळची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघात महायुतीने विद्यमान आ. मेघना साकोरे बोर्डीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीकडून माजी आ. विजय भांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश नागरे हे निवडणूक रिंगणात राहणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत…

Read More

दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने २ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (२४ ऑक्टोबर) फेटाळली आहे. न्यायमूर्ती म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू शकते. मात्र त्यांना या निवडणूक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाकडे देताना काही अटी घातलेल्या आहेत. या अटी पाळल्या जात नाहीत, असे सांगत शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार गटाकडून अटी पाळल्या जात नाही आणि त्यामुळे घड्याळ चिन्ह गोठवून त्यांना आमच्याप्रमाणेच (तुतारी) नवीन चिन्ह…

Read More

पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ते उमेदवारीसाठी आग्रही असताना व महाविकास आघाडी कडून विद्यमान आ. सुरेश वरपूडकर किंवा माजी आ. दुर्राणी यांच्या नावाचे अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच दुर्राणी यांनी दबाव तंत्राचा वापर करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचे बोलले जात आहे. सोबतच दुर्राणी हे मागील काही दिवसापासून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरोगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथे जाऊन भेटीगाठी घेत असल्याने त्यांचे समर्थन घेत अपक्ष उमेदवारी दाखल केली असावी असाही…

Read More

नांदेड – कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीस संमती दिली असल्याची माहिती कॉँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ आता रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला मात्र खासदार झालेल्या वसंत चव्हाण यांचे…

Read More

पुण्यात म्हाडातर्फे विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजतापासून सुरू झाली आहे. अर्जदारासाठी पात्रता काय? (eligibility for mhada application) म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. म्हाडामध्ये तुमच्या वार्षिक उत्पनानुसार विविध श्रेणीतील घरांसाठी अर्ज करता येतो. अर्जदाराचे मासिक उत्पन्न २५,००१ ते ५०,००० रुपयांपर्यंत असेल तर ती व्यक्ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतो. अर्जदाराचे मासिक उत्पन्न ५०,००१ ते ७५,००० च्या दरम्यान असेल त्यांना मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकांसाठी…

Read More

बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन (big boss marathi season 5) हा शो गाजवणाऱ्या स्पर्धकांमध्ये जान्हवी किल्लेकरचं (Janhavi Killekar) नाव अग्रस्थानी आहे. बिग बॉस मराठी मध्ये तिच्या वागण्यामुळे चर्चेत असलेली जान्हवी किल्लेकर ग्रँड फिनालेमध्येही भाव खाऊन गेली. सुपर 6 मध्ये असलेली जान्हवी ग्रँड फिनालेमध्ये सर्वात पहिले बाहेर पडली. View this post on Instagram A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar) बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह आहे. तिच्या अकाऊंटवर विविध पोस्ट, व्हिडीओ टाकत असते. त्यातच आता तिने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओची खूप चर्चा आहे. बिग बॉसमध्ये टास्क क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली जान्हवी,…

Read More